पिंपरी | आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, (प्रतिनिधी) – थेरगाव येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या मदर अॅन्ड चाईल्ड केअर युनिट तर्फे ‘स्प्लॅश ऑफ कलर्स’ या पावसाळी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा 3 ते 4 वर्षे, 5 ते 9 वर्षे व10 ते15 वर्षे वयोगटात पार पडली. लहान मुलांमध्ये आरोग्याची काळजी घेण्याबाबत जागृती करण्याचा या उपक्रमामागचा उद्देश होता.
यावेळी हॉस्पिटलचे सीईओ पमेश गुप्ता म्हणाले, समाजाच्या भल्याचा विचार करणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. चित्रकला स्पर्धा हे कलात्मकता आणि सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण ठरले. संपूर्ण दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमाचा आनंद घेत मुलांनी दाखवलेल्या त्यांची कला पाहणे एक आनंददायी अनुभव होता.
बालरोग विभागाच्या संचालिका डॉ. प्रिया मानकरे यांनी उपस्थितांना पावसाळ्यातील आरोग्यविषयक काळजी व लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत मुले व पालकांना मार्गदर्शन केले.यावेळी हॉस्पिटलच्या मदर अॅन्ड चाईल्ड केअर डिपार्टमेंट तर्फे आयोजित या कार्यक्रमात मुलांना आकर्षित करणारे जादूचे प्रयोग,
नृत्याचे कार्यक्रम आणि टॅटू कलाकार यांनी मुलांचा वेळ आनंदात गेला. या चित्रकला स्पर्धेचा निकाल 31 जुलै रोजी घोषित करण्यात येणार आहे. पहिल्या 10 विजेत्यांच्या चित्रांन हॉस्पिटल च्या बालरोग विभागात लावण्यात येणार आहे.





