Aditi Tatkare Vs Bharat Gogawale | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे विरुद्ध शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यात संघर्ष सुरु आहे. तर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे आमने-सामने आहेत. याचदरम्यान राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 15 ऑगस्ट रोजी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. यात रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडेच ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. रायगडमधून अदिती तटकरेंच्या नावाचा समावेश करताच रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. झेंडावंदन करणं आणि पालकमंत्रिपद यात फरक एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भरत गोगावले म्हणाले की, “मी आजही पालकमंत्रिपदावर १०० टक्के ठाम आहे. रायगडाचा पालकमंत्री व्हावं ही माझी इच्छा आहे. झेंडावंदन करणं आणि पालकमंत्रिपद यात फरक आहे. झेंडावंदन झालं म्हणजे पालकमंत्री झालं असं नाही. कारण ते पहिलंच देण्यात आलं होतं. त्यासाठी वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल. त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मी आजही पालकमंत्रिपदावर १०० टक्के ठाम आहे. झेंडावंदन झाल्यानंतर याबद्दल वरिष्ठ निर्णय करतील,” असे स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिले. Aditi Tatkare Vs Bharat Gogawale | मंत्रिमंडळाच्या बैठकीला भरत गोगावले अनुपस्थित दरम्यान, आज राज्य सरकारची कॅबिनेट बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली आहे अशातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आज भरत गोगावले अनुपस्थित राहणार आहेत. याचे कारण देत भरत गोगावले सांगितले की, दिल्लीत राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरबाबत काम होते. आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे याबाबत काही मुद्दे होते. त्या अनुषंगाने आज केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली आहे. त्यामुळे गोगावले मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित असणार आहेत. Aditi Tatkare Vs Bharat Gogawale | हेही वाचा : “दंगलखोर मुस्लिम असते तर त्यांच्यावर गोळ्या…” ; फतेहपूर कबर-मंदिर प्रकरणी काँग्रेस खासदाराचे वादग्रस्त विधान