अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; अभिनेत्रीने शेअर केले फोटो

Aditi Rao Hydari | बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले आहेत. 16 सप्टेंबर रोजी दोघांनी 400 वर्षे जुन्या मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर आता त्यांचे राजस्थानमधील रॉयल वेडिंगचे फोटो समोर आले आहेत.अदिती राव हैदरीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या लेहेंग्यात अदिती राव हैदरी खूपच सुंदर दिसत आहे. तर सिद्धार्थ क्रीम रंगाची शेरवानी आणि मोत्यांची माळा परिधान केलेला दिसत आहे. दोघांनी ब्रायडल फोटोशूटही केले आहे. खरं तर दोघांनी दुसरं लग्न केलंय की ते फक्त ब्राइडल फोटोशूट आहे. हे जाणून घेण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.
View this post on Instagram
फोटोंमध्ये हे जोडपे लग्नाचे विधी करताना दिसत आहेत. दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘आयुष्यात एखादी खूप सुंदर गोष्ट असेल तर ती म्हणजे एकमेकांची साथ’, असे लिहिले आहे. सध्या त्यांच्या या फोटोवर चाहत्यांकडून प्रेमाचे वर्षाव होत आहे.
दरम्यान, आदिती-सिद्धार्थ यांचा याच वर्षी मार्चमध्ये एंगेजमेंट झाली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांचे लग्न झाले. आता ती दुसऱ्यांदा सिद्धार्थची वधू बनली आहे. दोघेही 2021 पासून एकत्र होते त्यानंतर त्यांनी 2024 मध्ये लग्न केले.
अदिती रावचे पहिले लग्न 2009 मध्ये अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत झाले होते. लग्नानंतर अवघ्या चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्याचवेळी सिद्धार्थने 2003 मध्ये पहिले लग्न केले होते आणि लग्नाच्या चार वर्षानंतर सिद्धार्थचा घटस्फोटही झाला होता. दोघांचाही हे दुसरे लग्न आहे.





