आदिनाथ कोठारे सांभाळणार नव्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा

Adinath Kothare | अभिनेता आदिनाथ कोठारेचा अलीकडेच ‘पाणी’ हा चित्रपट रिलीज झाला. यानंतर आता आदिनाथ एका नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. दिवाळीनिमित्त त्याने याबाबत मोठी घोषणा केली आहे. ‘जय मल्हार – आता बळीचं राज्य यनार’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याने जेजुरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेऊन ही खास गोष्ट शेअर केली आहे.
आदिनाथच्या ‘पाणी’ला अभूतपूर्व यश, प्रेक्षकांचं प्रेम मिळत असताना त्याने ही गोड बातमी प्रेक्षकांना दिली आहे. ‘पाणी’ चित्रपटानंतर आता आदिनाथची नवी कलाकृती बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दरम्यान, या चित्रपटाची नेमकी कथा काय असणार आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हे लवकरच प्रेक्षकांना समजणार असून यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. २०२६ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येण्याची शक्यता आहे.





