तरुण पिढी सोशल मिडीयाच्या व्यसनाच्या आहारी

नाते टिकवण्यासाठी अडकतात लाईक-शेअरच्या मायाजालात

वॉशिंग्टन – भारतासह जगभरच स्मार्टफोन्सचा सुळसुळाट झाल्याने आणि इंटरनेटची अव्याहत उपलब्धता असल्याने सर्व देशांमधील राजेकाय नेत्यांसमोर प्रश्‍न उभा राहिला आहे, तो म्हणजे या सोशल मिडीयाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला त्यातून बाहेर कसे काढायचे? बहुतांश युवक-युवती सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्‌वीटर, लिंक्‍ड-इनसह युट्युब आणि अन्य पब्जीसारख्या मोबाईल गेम्समध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

यासंदर्भात, अमेरिकेतील सॅलफोर्ड युनिव्हर्सिटीने जगभरातील विविध देश-प्रांतामधील पाच हजार युवक-युवतींचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार बाहेर आलेली माहिती धक्कादायक आहे. सोशल मीडियामुळे जीवन उद्‌वस्त झाल्याचे 50 टक्के युवकांनी म्हटले आहे. मित्रांशी ऑनलाइन तुलना केल्याने प्रतिष्ठेला ठेच पोहोचते असे मतही 33 टक्के युजर्सनी व्यक्त केले. तुम्हाला जर सोशल मीडियाचे हे व्यसन सोडवायचे असेल तर स्वत:वर नियंत्रण ठेवले पाहिजे.

काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न आणि ज्या गोष्टींमुळे आपल्याला टेन्शन येते त्याला अनफॉलो करा. तसेच सोशल मीडियापासून काही वेळ दूर राहणेसुद्धा चांगले असते, असे या क्षेत्रात काम करत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी वारंवार सांगत आहेत. पण कोणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसल्याचे भयाण वास्तव समोर येत आहे.

आपल्यापैकी अनेकजण दिवसातून आपल्या महत्वाच्या कामाव्यतिरिक्त सर्वाधिक वेळ हा बहुतांश सोशल मीडियासाठी देत असतो. या जगात फिलिपाइन्स या देशातील लोक सर्वात जास्त वेळ सोशल मीडियावर व्यतित करत असतात. पण यामागे वैज्ञानिक कारण असून एखादी पोस्ट आवडली म्हणून तुम्ही लाइक, कमेंट करता पण हे सर्व कशामुळे घडते, ती प्रक्रियाही तितकीच रंजक आहे.

आपण दिवसभर सोशल मीडियावर स्क्रोल करत असतो. नोटिफिकेशन आले की तुम्ही ते लगेच काय आहे या उत्सुकतेपोटी उघडून पाहतो. मेंदुतील रिवॉर्डिंग सेंटर फेसबूक-ट्‌विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे ऍक्‍टिवेट होते. जगभरात प्रत्येक युझर सरासरी 135 मिनिटे म्हणजेच जवळपास सव्वा दोन तास सोशल मीडियावर घालवतो.

याचाच अर्थ लोकांचा दिवसातील 10 टक्के वेळ सोशल मीडियावर खर्ची पडतो. आनंदाची भावना मेंदुमध्ये असलेल्या डोपामाइनमुळे निर्माण होते. त्याचा यावर जबरदस्त प्रभाव पडतो. दारू आणि सिगारेटच्या व्यसनापेक्षा ट्‌वीट करण्याचे व्यसनसुद्धा यातून निर्माण होते. महिलांमध्ये हे व्यसन 60 टक्के तर पुरुषांमध्ये 56 टक्के एवढे आहे.

एखादी पोस्ट शेअर करण्यामागे, ती माहिती इतरांना पोहचवणे असा 68 लोकांचा उद्देश असतो तर 78 टक्के लोक यासाठी शेअर करतात की इतरांसोबत कनेक्‍ट राहता यावे. तर काहीजण सोशल मीडियावर असलेले नाते टिकवण्यासाठी लाइक आणि शेअरच्या मायाजालात गुरफटत राहतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)