अदानीचं उत्पन्न घटलं, तिसऱ्या नंबरवर घसरण

काही काळाअगोदर अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या काही काळ ते रिलाअन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना माघे टाकतील.
मात्र, शेअर्स ढासळल्यामुळे अंबानी व अदानी यांच्यात १.२५ लाख कोटी रुपयांचा फरक पडला आहे. एकेकाळी वेगाने प्रगती करणारे अदानी २०२१ मध्ये सगळ्यात जास्त व्यापारात खाली आलेले व्यापारी आहेत. ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गौतम अदानी यांच्या संपत्तीतही घट झालेली आहे. त्यामुळे आता ते आशियामधील तिसरे श्रीमंत व्यक्ती आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सच्या मते त्यांची एकूण संपत्ती ५.०१ लाख कोटी रुपये इतकी आहे. तर एकीकडे मुकेश अंबानी यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असून, त्यांची एकूण संपत्ती ६.२६ लाख कोटी रुपये इतकी आहे.
आशियामध्ये सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वाटर किंग झोगं शानशांन आहे. त्यांची एकूण संपत्ती ५. १४ लाख कोटी इतकी आहे. विशेष म्हणजे आशियातील ५ सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी अंबानी वगळता सर्व चीनी व्यावसायिक आहेत.
चौथ्या क्रमांकावर मा हुअतेंग आहेत, त्यांची संपत्ती ४.४२ लाख कोटी इतकी असून अलिबाबाचे संस्थापक जैक मा पाचव्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती ३.५८ लाख कोटी इतकी आहे.





