Adani Group | अदानी समूहाकडून विल्मर कंपनीची विक्री…

मुंबई – अदानी समूहाने अदानी विल्मर कंपनीतून आपला पूर्ण हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी विल्मरमधील आपला सर्व हिस्सा सिंगापूरच्या भागीदाराला दोन अब्ज डॉलरला विकला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
प्राप्त माहितीनुसार अदानी समूह आपल्याकडील 31.60% शेअर सिंगापूरच्या कंपनीला विकणार आहे. तर त्यानंतर उरलेले 13 टक्के शेअर खुल्या बाजारातून विकले जाणार आहेत. यातून अदानी समूहाला 19 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. त्यानंतर अदानी विल्मर कंपनीच्या संचालक मंडळावरून अदानी समूहाचा संचालक राजीनामा देणार आहे.
31 मार्च 2025 पर्यंत हा व्यवहार पूर्ण करण्यात येणार आहे. यातील रक्कम अदानी एंटरप्राईजेस या कंपनीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे समजते. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत अदानी समूहातील प्रमुख व्यक्तींविरोधात 265 दशलक्ष डॉलरच्या भ्रष्टाचाराच्या आरोप करण्यात आला होता. त्यानंतर प्रथमच अदानी समूहाने एवढा मोठा व्यवहार केला आहे.
अमेरिकेतील न्यायालयात नोंदण्यात आलेल्या आरोप अदानी समूहाने भेद फेटाळले आहेत. आमची बाजू आम्ही न्यायालयात मांडू असे सांगितले आहे. सध्या अदानी समूह आणि सिंगापूर मधील विल्मर कंपनीकडे अदानी विल्मरमधील 87.87% शेअर आहेत. या व्यवहारानंतर प्रवर्तकाची कंपनीतील शेअर आवश्यक इतक्या प्रमाणात कमी होणार असल्याचे दिसून येते.
GDP growth | पुढील 6 महिन्यात विकास दर वाढण्यासाठी पूरक परिस्थिती – गव्हर्नर संजय मल्होत्रा
अदानी विल्मर कंपनीची स्थापना 1999 मध्ये झाली होती. ही कंपनी खाद्यतेल, गव्हाचे पीठ, डाळी, तांदूळ, साखर इत्यादी क्षेत्रात काम करते. भारतातील 10 राज्यात या कंपनीचे 23 कारखाने आहेत. सध्या या कंपनीचे बाजार मूल्य पाच अब्ज डॉलर म्हणजे 43 हजार कोटींच्या जवळपास आहे.



