Chhava Film : ‘छावा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल
Sanchita Ugale : अभिनेत्रीचे 'कुमकुम भाग्य' आणि 'वागले की दुनिया' यांसारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही काम

Sanchita Ugale: अभिनेत्री संचिता उगले हिने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी आत्महत्या केली आहे. तिने नालासोपारा परिसरातील राहत्या घरात स्वत:चे जीवन संपवले आहे. संचिता उगलेच्या अचानक झालेल्या निधनाच्या दुःखद बातमीमुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री हादरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अभिनेत्री तिच्या आई-वडील आणि १५ वर्षांच्या लहान बहिणीसोबत नालासोपारा परिसरात राहत होती. घटना घडली त्या वेळी ती घरात एकटीच होती. संचिताने काल संध्याकाळी ६:३० ते ७:३० च्या दरम्यान साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. (Chhava Film)
ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तिला तात्काळ महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. तसेच तिच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Chhava Film)
विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटात काम (Sanchita Ugale)
संचिता उगले टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील एक ओळखीचा चेहरा होती. तिने ‘दिलवाली दूल्हा ले जाएगी’ या चित्रपटात ‘सुकून’ची भूमिका साकारली होती. याशिवाय, ‘छावा’ चित्रपटात तिने ‘ताराबाई’ यांची भूमिका साकारली होती. (Chhava Film)
संचिताने ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘वागले की दुनिया’ यांसारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही अभिनय केला होता, ज्यामुळे तिला प्रेक्षकांमध्ये चांगली ओळख मिळाली होती.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट (Sanchita Ugale)
सध्यातरी संचिता उगलेच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी भारतीय न्याय संहित च्या कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलीस कुटुंबीय आणि जवळच्या लोकांची चौकशी करून आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. Sanchita Ugale
हेही वाचा:






