Urmila Kothare Car Accident : अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात; 2 मजुरांना उडवलं

मुंबई : मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ हा अपघात झाला आहे. उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत होती, त्यावेळी तिच्या कारचा अपघात झाला. तिच्या ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे.
2 मजुरांना उडवलं
या अपघातात त्यांच्या कारने दोन मजुरांना उडवलं, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरदेखील जखमी झाला आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या अपघातात उर्मिला यांचा जीव वाचला मात्र त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अभिनेत्री उर्मिला कोठारे – कानेटकर यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास ती प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांची सून आहेत. तर आदिनाथ कोठारे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच उर्मिला कोठारे ही नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेतून तब्बल 12 वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं.





