अभिनेत्री सुष्मिता सेनची महिला दिनी खास पोस्ट; महिलांना दिला ‘हा’ संदेश म्हणाली…

आज 8 मार्च देशभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात शुभेच्छा देत साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधत प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनने सोशल मीडियावर महिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. सुष्मिता सेन आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ती नेहमी विविध मुद्द्यांवर भाष्य करत असते. विशेषत: ती वेळोवेळी स्त्री स्वातंत्र्य आणि हक्कांबद्दल उघडपणे आपली मतं मांडताना दिसते. आज दि 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत तिने एक सुंदर पोस्ट तिच्या इन्स्टा अकाउंटवरून महिलांसाठी शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने महिलांसाठी एक संदेश दिला आहे.
सुष्मिताने स्वतःचा एक फोटो या पोस्टमध्ये शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. त्यासोबत तिने लिहिले आहे की, ‘महिला आणि ज्यांना एकत्र येण्याबद्दल सहानुभूती आहे, त्यांच्यासाठी या बहिणाबाईंचा एक भाग बनणे हा किती मोठा बहुमान आहे. ‘तुम्हा सर्वांना कधीच भेटले नाही, तरीही माहीत असूनही… तुम्ही मला समजून घेता, जसे मी तुम्हाला समजते’.
पुढे ती लिहिते ‘आपल्या भावनांची खोली, आपल्या कमकुवतपणात दडलेली ताकद, सर्व अडचणी असूनही आपली लवचिकता, आयुष्य सहन करण्याची ताकद कोण समजू शकेल? इतरांचे पालनपोषण करण्याच्या आपल्या निवडीची शक्ती कोण खरोखर समजू शकेल? प्रेमाची अतृप्त भूक, क्षमा करण्याची अशक्य क्षमता, प्रत्येकाच्या आनंदाची काळजी करण्याचे धैर्य या काही गोष्टी आहेत, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा
तसेच ‘थकवा, मनातील वेदना, निर्णय, समजूतदारपणाचा अभाव, सामाजिक दबाव, असमानता आणि अगदी आपले बदलते जीवशास्त्र… होय, हे सर्व खरे आहे. आणि तरीही…फक्त देव जाणतो की या सर्व गोष्टी आपल्याला पुढे नेण्यासाठी इंधन म्हणून काम करतात’. ‘मी आपल्या सर्वांना सुंदर जीवन जगण्याचे धैर्य, आर्थिक स्वातंत्र्य, भरपूर प्रवास, स्वतःसोबत जेवणाचा आनंद लुटण्याचा आत्मविश्वास आणि निर्भयपणे ‘नाही’ म्हणण्याचे धैर्य मिळावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, अशी पोस्ट अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केली आहे.





