Surbhi Jyoti Photoshoot : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुरभी ज्योती लवकरच आई होणार आहे. लग्नानंतर सुमारे दीड वर्षांनी तिने आपल्या गरोदरपणाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. ती सोशल मीडियावर अधूनमधून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते. Surbhi Jyoti Photoshoot नुकतेच तिने सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करत तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. सुरभी सध्या आपली पहिली प्रेग्नंसी एन्जॉय करत असून तिने नुकतेच तिचे मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. Surbhi Jyoti Photoshoot : अभिनेत्री सुरभी ज्योतीचे मॅटर्निटी फोटोशूट; खास ड्रेसमध्ये खुलले सौंदर्य या फोटोशूटसाठी तिने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता, ज्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल होत असून चाहते तिच्या या लूकवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. Surbhi Jyoti Photoshoot विशेष म्हणजे सुरभी एक नाही, तर जुळ्या बाळांना जन्म देणार असल्याची चर्चा आहे. तिच्या बेबी बंपवरील फोटो पाहून चाहत्यांनी आधीच तर्क लावायला सुरुवात केली आहे. Surbhi Jyoti Photoshoot सुरभीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. ‘कुबूल है’, ‘नागिन’, ‘गुनाह’ आणि ‘कोई लौट के आया है’ या मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. तसेच काही वेबसीरिज आणि चित्रपटांमधूनही ती झळकली आहे. Surbhi Jyoti Photoshoot हेही वाचा: MLA Santosh Bangar : “मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, अशा मंत्र्यांना…”; आमदार संतोष बांगरांनी थेट श्रीकांत शिंदेसमोर मंत्र्यांना दिला घरचा आहेर