शत्रुघ्न सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचा विवाहसोहळा आज संपन्न झाला. त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. मागील अनेक दिवसांपासून सोनाक्षीच्या लग्नाची बरीच चर्चा होती. तसेच घरच्यांना देखील हे लग्न मान्य नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण अखेर कुटुंबाच्या आणि जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि झहीरने लग्न केलं. मुंबईतील वांद्रे परिसरात सोनाक्षी आणि झहीरने लग्नगाठ बांधली. तसेच आता त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला अनेकांना आमंत्रित केले असून मुंबईतील दादर परिसरातील बॅस्टियन रेस्टॉरंट येथे हे रिसेप्शन पार पडणार आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर आज लग्नबंधनात अडकले. कशी सुरु झाली सोनाक्षी आणि झहीरची लव्हस्टोरी? सोनाक्षी आणि जहीर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने ‘डबल XL’चित्रपटात एकत्र काम केले आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मागील वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं प्रेम जगजाहीर केलं आणि आज ते लग्नबंधनात अडकले.