अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर फसवणूकीचा गुन्हा

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यावर फसवणूकीप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. एका स्टेज शोसाठी पैसे घेऊनही सोनाक्षीने शो केला नसल्याचा तिच्यावर आरोप आहे. याच प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील काटघर पोलीस ठाण्यात सोनाक्षीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोनाक्षीने एका स्टेज शोसाठी आयोजकांकडून 24 लाख रुपये घेतले होते मात्र, कार्यक्रम केला नव्हता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनाक्षीला ताब्यात घेण्यासाठी काल उत्तर प्रदेश पोलीस सोनाक्षीच्या मुंबईतील घरी पोहोचले, मात्र ती घरी नव्हती. त्यामुळे आता तिच्यावर पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात येते हे पाहणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.