कौतुक करावे तेवढे कमीच! अभिनेत्रीने चक्क स्वतःच्या लग्नातील बांगड्या नवविवाहित नवरीला दिल्या भेट, व्हीडिओ व्हायरल

Raveena Tandon | बॉलीवुड अभिनेत्री रवीना टंडन सध्या अभिनयापासून लांब आहे. असे असले तरीही तिच्या वक्तव्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या रवीनाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये रवीनाने केलेल्या कृतीने सर्वांचेच मन जिंकले.
रवीना नुकतीच एका सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या कृतीने सर्वांचे मन जिंकले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रवीना विवाह सोहळ्यातील नवविवाहित जोडप्याला तिच्या लग्नातील बांगड्या भेट म्हणून देत आहे. रवीनाच्या या कृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
हा समारंभ मुंबईतील बीएमसी चॉलमध्ये मोहसिन हैदर यांनी आयोजित केला होता. रवीना टंडन या सामूहिक सोहळ्याला सुंदर लाल कुर्ता सेट घालून पोहोचली होती. लग्न समारंभादरम्यान तिने नवविवाहित जोडप्याला स्वत:च्या लग्नातील बांगड्या भेट म्हणून दिल्या.
View this post on Instagram
यावेळी बोलताना रवीना म्हणाली की, पंजाबी लग्नांमध्ये नवरी 40 दिवस चूडा घालते. मी माझ्या लग्नात या दोन बांगड्या घातल्या होत्या. त्यापैकी एका बांगडीवर माझं नाव आणि दुसऱ्या बांगडीवर माझ्या पतीचं नाव लिहिलं आहे. मी हे नवविवाहित जोडप्याला भेट देत आहे.
रवीनाने नवविवाहित जोडप्याला बांगड्या भेट देत, नवरीची गळाभेट घेत त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. रवीनाने तिच्या लग्नातील या स्पेशल बांगड्या अशाप्रकारे नवरीला भेट दिल्याने तिची प्रशंसा होत आहे.





