मुंबई – अभिनेत्री रसिका दुग्गलने आपल्या दमदार अभिनयाने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. रसिका दुग्गल लवकरच आणखी एका धमाकेदार प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
“मिर्झापूर’ या वेबसिरीजमुळे रसिकाला खूप प्रसिद्धी मिळाली. आता ती निष्ठा शैलाजन आणि धवन शहा यांच्या आगामी ‘स्पाइस’या वेब सिरीजमध्ये काम करणार आहे.
रसिका दुग्गल ही प्रथमच खेळाशी संबंधित एखाद्या चित्रपटात अभिनय करणार आहे. आतापर्यत चाहत्यांनी रसिकाला विविधांगी भूमिका साकारताना पाहिलेले आहे. मात्रा, आता ती खेळाच्या मैदानात व्हॉलीबॉलच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
या भूमिकेसाठी रसिका कठोर परिश्रम घेत असून तिने मुंबईत 3 महिन्यांचे हॉलीबॉलचे प्रशिक्षणदेखील घेतले आहे. विशेष म्हणजे, हे प्रशिक्षण घेत असताना तिने हिमाचल प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील शूटिंगदेखील पूर्ण केले आहे.
“स्पाइस’मध्ये रसिका मुख्य भूमिका साकारत असून या भूमिकेत तिला पाहण्यासाठी चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रसिका दुग्गल सध्या
“स्पाइस’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती “दिल्ली क्राइम सिजन-3′ आणि ‘लॉर्ड कर्जन की हवेली’ या वेब सिरीजमध्येही काम करत आहे.