प्राजक्ता माळीने कुटुंबासह साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा 40वा वाढदिवस; सेलिब्रेशनचे खास फोटो पाहा

Prajakta Mali : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी अनेक गोष्टी शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ता उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला उपस्थित होती. नुकतेच तिने तिच्या आई-बाबांच्या लग्नाचा 40वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्राजक्ताने तिच्या आई-वडिलांच्या लग्नाचा 40वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीमध्ये तिने वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. प्राजक्ताने या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिचे आई-बाबा, भाऊ, वहिनी व कुटुंबातील इतर सदस्य दिसत आहेत. प्राजक्ताने आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करताना खास सेल्फी शेअर केला आहे.
View this post on Instagram
तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले की, ‘माझ्या आईवडिलांच्या लग्नाचा 40वा वाढदिवस. 10/02/1985 पासून आतापर्यंत. आणि येणारी पुढील बरीच वर्षे. सर्व अडचणींना तोंड देत त्यांनी त्यांचे आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला.’ या पोस्टवर चाहत्यांकडूनही प्राजक्ताच्या आई-वडिलांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
दरम्यान, प्राजक्ताच्या कामाबद्दल सांगायचे तर तिचा ‘फुलवंती’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गाजला. आता ती लवकरच ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 28 फेब्रुवारीला रिलीज होईल.





