अभिनेत्री पूनम पांडे ‘रामलीला’मध्ये साकारणार रावणाच्या पत्नीने पात्र; साधू-संतांची नाराजी

Poonam Pandey | अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे तिच्या बोल्ड आणि हॉट लुकसाठी खासकरून ओळखली जाते. मात्र दिल्लीतील प्रसिद्ध लव कुश रामलीलामध्ये पूनम रावणाची पत्नी मंदोदरीचे पात्र साकारणार आहे. दिल्लीतील सर्वात जुन्या रामलीला समितीने पूनम पांडेला या भूमिकेसाठी आमंत्रित केल्यावरुन वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेने पूनम पांडेला विरोध केला आहे. तसेच अयोध्येतील साधू-संतांमध्येही नाराजी पसरली आहे.
पूनम पांडे तिच्या अश्लील व्हिडिओ आणि विचित्र दाव्यांमुळे वारंवार चर्चेत असते. अलीकडेच तिने स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती, ज्यावरून वाद निर्माण झाला होता. आपण फक्त गर्भाशयाच्या कर्करोगाच्या लसीबद्दल जागरूकता निर्माण करत असल्याचे तिने स्पष्टीकरण दिले होते. यामुळे विश्व हिंदू परिषदेने रामलीला समितीला त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. या निर्णयामुळे सांस्कृतिक आणि धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे विहिंपने म्हटले आहे. Poonam Pandey |
पूनम पांडेने मंदोदरी साकारणार असल्याचा मुद्दा तापला आहे. संत दिवाकराचार्य जी महाराजांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘राणी मंदोदरी रावणाची पत्नी होती आणि तिच्या सती व्रत आणि पती व्रत कधीही तडजोड केली गेली नाही. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा मंदोदरीने रावणाला विरोध केला. मंदोदरी साकारणारी व्यक्ती शरीराने आणि मनाने शुद्ध असली पाहिजे. अशा लोकांकडून सादर होणारी रामलीला पाहणे हिंदू समाज स्वीकारणार नाही.’ Poonam Pandey |
रावण पात्र अभिनेता आर्य बब्बर साकारणार
दरम्यान, रावणाची पत्नी मंदोदरी हे पात्र पूनम पांडेला, तर रावण हे पात्र अभिनेता आर्य बब्बर साकारत आहे. आर्य हा ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा असून प्रतीक बब्बरचा सावत्र भाऊ आहे. दरम्यान, रामलीला समितीने मंदोदरीची भूमिका दिल्यानंतर पूनम पांडेने एका पोस्टद्वारे त्यांचे आभारही मानले आहेत. Poonam Pandey |
हेही वाचा:
“…पण लोकांसाठी तो एक.. “; त्या भूमिकांबद्दल सई ताम्हणकर स्पष्टच बोलली…





