अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात; म्हणाली “काहीतरी भयानक घडू शकलं असतं”

Nora Fatehi | अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात झाला, ज्यात तिला किरकोळ दुखापत झाली. नोरा फतेही सनबर्न फेस्टिव्हलमध्ये डेव्हिड गुएटासोबत तिच्या नियोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती. त्यावेळी तिच्या कार चालकानं एका दुसऱ्या वाहनाला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीचा कार चालक कार चालवताना दारू प्यायला होता.
विशेष म्हणजे या अपघातानंतरही नोराने स्टेजवर परफॉर्म केलं. दुखापत झाल्यानंतर काही तासांतच तिने मुंबईतील डीजे डेव्हिड गुएटासोबत स्टेजवर हजेरी लावली होती. यानंतर आता तिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत अपघाताबातची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच तिने हेल्थ अपडेट दिली आहे.
नोराची प्रतिक्रिया
“मी सध्या ठीक आहे. दुपारी माझ्या कारचा गंभीर अपघात झाला होता. मद्यपान केलेल्या एका व्यक्तीची कार माझ्या गाडीला जोरात धडकली होती. ही धडक इतकी जोरदार होती की मी माझ्या गाडीच्या दरवाजावर आदळली गेली. माझं डोकं खिडकीवर जोरात आदळलं. पण मी जिवंत आहे आणि आता बरी असून काही किरकोळ दुखापती आणि सूज आहे.
View this post on Instagram
अजूनही मी त्या धक्क्यातच आहे. पण ठीक आहे. या अपघातात काहीतरी भयानक घडू शकलं असतं. त्यामुळे तुम्ही दारू पिऊन कधीच गाडी चालवू नका. मला सुरुवातीपासूनच दारूचा तिरस्कार आहे. दारू, ड्रग्ज, गांजा किंवा एखाद्या व्यक्तीची मनस्थिती, सतर्कता बदलणारी कोणतीही गोष्ट मला कधीच आवडली नाही. या गोष्टींना मी कधीच प्रोत्साहन देत नाही किंवा त्यांच्या आजूबाजूला राहणं देखील मला आवडत नाही,” असे नोराने म्हंटले आहे.
पुढे तिने लोकांना आवाहन करत सांगितले की, “मद्यपान करून कधीच गाडी चालवू नका. हे 2025 आहे आणि अजूनही आपण याविषयी बोलतोय यावर मला विश्वासच बसत नाही. भर दुपारी 3 वाजता अशी एखादी घटना घडावी यावरही मला विश्वास बसत नाही. एखाद्याने मद्यपान करून गाडी चालवावी आणि स्वत:चा, दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालावा, याची मी कल्पनाच करू शकत नाही. मी तुम्हाला कळवू इच्छिते की मी ठीक आहे. काही काळ वेदना जाणवतील, पण देवाच्या कृपेने मी जिवंत आहे”,अशा शब्दांत नोरा व्यक्त झाली.
दरम्यान, अपघातानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली असून संबंधित चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा:
मुक्ताईनगरचा गड राखण्यात रक्षा खडसे यांना अपयश; शिंदेसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी





