मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या अभिनयासोबतच लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत राहते. जर्सी या चित्रपटानंतर मृणाल ठाकूरला एक खास ओळख मिळाली होती.मृणालने छोट्या पडद्यावरही काम केले आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. सध्या ती आपल्या काही बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
मृणाल सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या लेटेस्ट फोटोंद्वारे चाहत्यांशी जोडलेली असते. दरम्यान, मृणालने पोस्ट केलेलं फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताहेत. हे फोटो पाहून चाहत्यांची अक्षरशः झोप उडाली आहे. मृणालचा एवढा बोल्ड अंदाज यापूर्वी केव्हाही पाहायला मिळाला नव्हता.
मृणाल ठाकूरने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट केले आहे, हे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये मृणाल खूपच बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. यावेळी मृणालने डीप नेक ब्रॅलेट टॉप कॅरी केला आहे. यासोबत तिने मॅचिंग लूज ट्राउझर्स आणि श्रग घातला आहे. ज्यामध्ये ती कमालीची बोल्ड दिसत आहे.
View this post on Instagram
फोटोशूटमध्ये मृणाल वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. अभिनेत्री सध्या तिची सुट्टी एन्जॉय करत आहे. यादरम्यान तिने हे फोटोशूट केलेलं पाहायला मिळत आहे. अनेक चाहत्यांनी मृणालच्या या फोटोचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिच्या बोल्डनेसवरून तिला सुनावले देखील आहे. काय मिळत असं करून.. अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्या एकाने ‘कोणतं लोकेशन ? अशी कमेंट केली आहे.