बॅालीवडूमधील कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी नवं घर, जागा थोडक्यात प्रॅापर्टी खरेदी करून इनवेस्टमेन्ट करत असतात. बॅालीवूडमधील अनेक कलाकारांनी मुंबईत विविध ठिकाणी अशा प्रकारची प्रॅापर्टी खरेदी केली आहे. आता अशा सेलिब्रिटींच्या यादीत आपल्या हास्यने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री काजोलने मुंबईत रियल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. तिने मुंबईतील पॅाश एरियात नवं घर खरेदी केले आहे. काजोलने मुंबईतील सर्वात पॉश एरियात कोट्यवधींची प्रॉपर्टी विकत घेतली आहे. तिने या एरियात आलिशान घर विकत घेतले आहे. ज्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. तिने खरेदी केलेल्या घराची बरीच चर्चा आहे. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन या सेलिब्रेटींनंतर काजोलनेही घर खरेदीची व्यवहार केले आहेत. इंडेक्सटॅपने मिळवलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांवरून गोरेगाव पश्चिममध्ये काजोलने एक व्यासायिक मालमत्तेची खरेदी केली आहे. ज्याची किंमत तब्बल 28 कोटी 78 लाख एवढी आहे. या खरेदीचा व्यवहार 6 मार्च 2025 रोजी झाला असल्याचे सांगितले जाते. काजोलने यासाठी 1 कोटी 72 लाख रुपयांचे रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरले आहे. काजोलने खरेदी केलेल्या या रिटेल जागेत पाच कार पार्किंगची जागा देखील आहे. याआधी काजोलने 2023 मध्ये ओशिवरा येथील सिग्नेचर बिल्डिंगमध्ये 7.64 कोटी रुपयांना ऑफिससाठी जागा खरेदी केली होती. काजोल प्रमाणेच तिचा नवरा आणि अभिनेता अजय देवगण याने देखील 2023 मध्ये मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली होती.