अभिनेत्री जुई गडकरी लवकरच अडकणार विवाहबंधनात; तारीखही केली जाहीर

मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेतील तिची सोज्वळ सुनेची भूमिका अनेकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर सध्या ती ‘ठरलं तर मग’ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत नुकतंच मंगळागौरीचं शूटिंग दाखवण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत जुईने तिच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.
मालिकेच्या निमित्ताने जुई आणि अमित भानुशाली यांनी मुलाखत दिली होती. यात त्यांना एकमेकांबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात जुईने तिच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. मुलाखतीत अमितला जुईच्या लग्नाची तारीख विचारण्यात आली होती. जुई खऱ्या आयुष्यात लग्न कधी करणार असं विचारताच अमित म्हणाला, ’24 फेब्रुवारी 2024. त्यावर त्याला सुधारत जुई म्हाणाली, ‘अमित थोडासा चुकलाय कारण, लग्नाची तारीख ४ आहे. महिना फेब्रुवारीचं असेल. यंदा माझा व्हॅलेंटाईन डे जरा चांगला साजरा होणार आहे. मी माझ्या जोडीदाराला सगळ्यात मौल्यवान गोष्ट गिफ्ट म्हणून देणार आहे…माझा वेळ आणि माझं संपूर्ण आयुष्य.’ असं जुईने सांगितलं
तिने ही माहिती दिल्यानंतर सध्या जुईवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यावेळी जुईने लग्नाची तारीख सांगितली. परंतु होणारा नवरा कोण आहे ? त्याचे नाव काय? ही माहिती तिने गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे चाहत्यांनी देखील तिच्या पाटर्नरबाबत अधिक जाणून घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. जुई गडकरीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तिने ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे’, ‘पुढचं पाऊल’ या मालिकांमध्ये काम केले आहे.





