अभिनेत्री हिना खानने ११ वर्षांच्या डेटींगनंतर रॉकीसोबत बांधली लग्नगाठ; शेअर केले खास PHOTO

Hina Khan | अभिनेत्री हिना खान सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे. या कठीण परिस्थितीचा देखील ती मोठ्या हिमतीने सामना करत आहे. याचदरम्यान आता हिना खानने गुपचूप लग्न उरकले आहे. 11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हिना आणि रॉकी लग्नबंधनात अडकले आहेत. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हिना खानने तिचा प्रियकर रॉकी जयस्वालसोबत लग्नाचे फोटो शेअर केले आहे. तसेच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत लिहिले की, ‘दोन वेगवेगळ्या जगातून, आम्ही प्रेमाचे विश्व निर्माण केले. आमचे मतभेद नाहीसे झाले. आमची हृदये एक झाली, एक असे बंधन निर्माण झाले जे आयुष्यभर टिकेल. आम्हीच एकमेकांसाठी घर, प्रकाश आणि आशा आहोत आणि आम्ही एकत्र सर्व अडथळे पार करू. आज आम्ही प्रेम आणि कायद्याने कायमचे बांधले गेले आहोत. पत्नी-पती म्हणून आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो,’ असे हिना खानने पोस्टमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
हिना खानचा पारंपरिक लूक
दरम्यान, हिनाने या लग्नासाठी पारंपरिक लूक केला होता. तिने तिच्या साडीवर एक खास ओढणीही घेतली आहे. तर तिने साडीच्या पदरावर ‘हिना फॉरएव्हर रॉकी’ असे लिहून घेतले होते. तिने लग्नासाठी सोनेरी-चंदेरी धाग्यांचे नक्षीकाम असणारी ओपल ग्रीन रंगाची मनिष मल्होत्रा कलेक्शनमधील साडी परिधान केली आहे. तिने यासोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज आणि डोक्यावर गुलाबी ओढणी घेतली होती. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
कोण आहे हिनाचा पती रॉकी जयस्वाल? Hina Khan |
रॉकी जयस्वालचे खरे नाव जयंत जयस्वाल आहे. तो एक प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्माता आणि उद्योगपती आहे. त्याने अनेक टीव्ही शोमध्ये पडद्यामागील काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र सध्या तो हिनासोबतच्या नात्यामुळे चर्चेत राहिला. हिनासोबतची त्याची प्रेमकहाणी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ च्या सेटवर सुरू झाली. हिनाने तिची अभिनय कारकीर्ददेखील याच मालिकेद्वारे सुरू केली होती.
दोघांनीही 2014 मध्ये डेट करण्यास सुरुवात केली. रॉकी या शोचा सुपरवाइजिंग प्रोड्यूसर होता. दोघांचीही पहिली भेट इथेच झाली. रॉकीने प्रत्येक अडचणीत हिनाची साथ दिली. कर्करोगाशी तिची सुरू असणारी झुंज म्हणा अथवा हिनाच्या वडिलांचे निधन झाले तेव्हाही रॉकी तिच्यापाठी खंबीरपणे उभा राहिला होता.
हेही वाचा :
पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे मदतीची याचना ; म्हणाले,”भारताशी संवाद साधायचाय…”





