‘रामायण’मधील कलाकार दिसणार ऐतिहासिक भूमिकेत; सिनेमाचं पोस्टर समोर

Arun Govil and Dipika Chikhlia | अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना ‘राम-सीता’ या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. आता या जोडीच्या अभिनयाची कला पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया ‘वीर मुरारबाजी.. पुरंदर की युद्धगाथा’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात ते छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
श्रीरामनवमीच्या निमित्तानं या दोघांचं आकर्षक पोस्टर प्रदर्शित झालं आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी…पुरंदर की युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे, तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केलं आहे
दरम्यान, रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी राम आणि सीतेची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. आजही ही जोडी लोकप्रिय आहे. लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर आता ही जोडी 37 वर्षांनंतर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली जाणार आहे. Arun Govil and Dipika Chikhlia |
हेही वाचा:





