‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’मधील कलाकार एकाच फ्रेममध्ये

Prasad Khandekar Team Photo | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या दोन्ही शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. 10 वर्षानंतर ‘चला हवा येऊ द्या’ शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र दोन्ही शोमधील कलाकारांना मोठी लोकप्रियता मिळाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ मधील कलाकारांची अचानक भेट झाली. याचा फोटो प्रसाद खांडेकर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई विमानतळावर एक दुर्मिळ क्षण पाहायला मिळाला. महाराष्ट्राची हास्यजत्रेची टीम आज अमेरिका टूरसाठी रवाना झाली. प्रसाद खांडेकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. पण यामध्ये अर्धे ‘हास्यजत्रा’ आणि अर्धी ‘चला हवा येऊ द्या’ची टीम दिसत आहे.
फोटोत प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, चेतना भट, अरुण कदम, समीर चौघुले, गौरव मोरे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे हे मराठी कलाकार दिसत आहेत. Prasad Khandekar Team Photo |
View this post on Instagram
प्रसाद खांडेकरने फोटो शेअर करत लिहिले की, ‘लवकरच…… पुन्हा भेटू आणि खूप गप्पा मारु असं एकमेकांना प्रॉमिस करुन निघालो आम्ही. आज अचानक गाठ पडे…मित्रांसोबत एक प्रसन्न सकाळ’ असं कॅप्शन दिलं आहे. हे सर्वजण अचानक विमानतळावर भेटले. हास्यजत्राची टीम अमेरिकेला जात आहे. तर इतर कलाकार वेगवेगळ्या कामासाठी रवाना झाले आहेत. यावर नेटकऱ्यांंनी ‘हास्यजत्रा आणि हवा येऊ द्याचं कोलॅब’ अशा विविध कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा:





