अभिनेता सुबोध भावे साकारतोय बिरबलाची भूमिका ! ‘या’ हिंदी वेब सिरीजमधील लूकची जोरदार चर्चा

मुंबई – मराठमोळा अभिनेता सुबोध भावेने नुकतंच एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम केल्याचे समोर आले. या हिंदी सिरीजमध्ये सुबोध एक आगवेगळी भूमिका साकारताना दिसतोय. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या सिरीजमध्ये सुबोध ‘बिरबलाची’ भूमिका साकारतोय. बिरबल आला म्हंटल की अकबर बादशहा देखील आला आणि त्यासोबत आलं ते म्हणजे मुघल साम्राज्य. सध्या मुघल साम्राज्य काळ दाखवणाऱ्या ताज या वेब सिरीजची चांगलीच चहरचा आहे.
ताज डिव्हायडेड बाय ब्लडचा जबरदस्त ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. यात नसीरुद्दीन शाह अकबरच्या भूमिकेत दिसत आहेत.या सिरीजमध्ये अभिनेता सुबोध भावे देखील नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत बिरबलाच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रेलरमध्ये सुबोधच्या पात्राची दमदार झलक देखील पाहायला मिळते. लोकमान्य टिळक,बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज असे अनेक दर्जेदार पात्र साकारल्यानंतर सुबोधला बिरबलाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
मुघल साम्राज्यावर आधारित ही वेब सीरिज लवकरच झी 5 वर प्रदर्शित होणार आहे. मुघल साम्राज्याच्या इतिहासातील सलीम आणि अनारकलीची हिट प्रेमकहाणी यात पाहायला मिळणार आहे. मुघल साम्राज्यातील वारसा हक्कावरून कुटुंबात होणारे वाद आणि लढाई यावेळी उलगडणार आहे. या सीरिजचे 10 भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
नसरुद्दीन शाह यांच्या व्यतिरिक्त या सिरीजमध्ये आशिम गुलाटी सलीमच्या भूमिकेत तर आदिती राव हैदरी अनारकलीच्या भूमिकेत आहे.प्रेम कथेसह वारसा हक्काची कहाणी सांगणारा या सिरींजचा ट्रेलर खूपच रंजक वाटत आहे. ट्रेलरमध्ये सुबोध भावेचा आगळावेगळा लूक बरंच काही सांगून जातोय.




