‘मी सवयीचा गुलाम नाही’ ; सोनू सूदची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोनूने आपल्या एसएलपीमध्ये म्हटले की, ना ही आपण सवयीचा गुलाम आहे आणि नाही कायदा किंवा नियमांबाहेर काही बदल केला आहे.
आपण हॉटेलच्या अंतर्गत बाबींमध्ये बदल केला आहे आणि महापालिकेच्या म्हणण्यानुसार अंतर्गत बदलाला कुठल्या मंजुरीची गरज नाही. तरीही 2018 मध्ये परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, बीएमसीकडून अद्याप त्या अर्जावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, असे सोनू सूदकडून सांगण्यात आले आहे.
अवैध बांधकाम प्रकरणात सोनू सूद यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून झटका मिळाला आहे. न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सोनू सूद यांनी याचिका फेटाळून लावली होती. सोनू सूद यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील इमारतीच्या बांधकामात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. त्यावर मुंबई महापालिकेकडून रहिवासी इमारतीचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्यामुळे नोटीस पाठवण्यात आली होती.
या नोटीसशी संबंधित शर्थींचे पालन करण्यासाठी सोनू सूदच्या वकिलांनी न्यायालयाकडे 10 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, न्यायालयाने कायदा हा मेहनती लोकांनाच मदत करतो, असे सांगत याचिका फेटाळून लावली होती.





