Shahrukh Khan | बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानबाबत एक माहिती समोर आली आहे. सध्या तो ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला आहे. बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, हा अपघात मुंबईतील एका चित्रपट स्टुडिओमध्ये शाहरुख अॅक्शन सीनचे शूटिंग करताना घडला. हा एक हाय-ऑक्टेन स्टंट होता, ज्यामुळे त्याच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. याच कारणामुळे त्याला शूटिंगमधून काही काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे. आता शाहारुख उपचारासाठी अमेरिकेला गेला आहे. शाहरुखला दुखापत झाल्यानंतर ‘किंग‘ चित्रपटाचे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे शूटिंग स्थगित करण्यात आले आहे. आता चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. शाहरुख खानला याआधीही वेगवेगळ्या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान दुखापती झाल्या आहेत. मात्र यावेळी दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिल्यामुळे अभिनेत्याला ब्रेक घ्यावा लागत आहे. मात्र त्याच्या दुखापतीची बातमी समोर येताच अभिनेत्याच्या चाहत्यांना त्याच्या तब्येतीबाबत चिंता वाटू लागली आहे. Shahrukh Khan | ‘किंग’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटात पहिल्यांदाच शाहरुख खान मुलगी सुहाना खानसोबत पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे, ज्यांनी शाहरुख खान यांच्या ब्लॉकबस्टर ‘पठान‘ चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात शाहरुख, सुहानासह अभिषेक बच्चन, जयदीप अहलावत सुद्धा दिसणार आहेत. Shahrukh Khan | हेही वाचा: अभियांत्रिकीतील ‘टाॅपर’ बनला चोर; ४ लाख ७४ हजार रुपयांचे दागिने लांबवून कर्नाटकात पसा