मुंबई – शाहिद कपूर नेहमीच आपल्या रोलमध्ये शिरून त्या भूमिकेला न्याय देत असतो. त्याने साकारलेल्या रोलबद्दल त्याला नेहमीच प्रेक्षकांची दाद मिळाली आहे. आता “जर्सी’तील क्रिकेटपटूच्या रोलसाठीही तने अशीच मेहनत घेतली आहे.
या रोलसाठी त्याने इतके कष्ट घेतले की शूटिंगदरम्यान तो चांगलाच जखमी झाला आणि त्याच्या जखमेवर तब्बल 25 टाके घालायला लागले आहेत. या जखमी अवस्थेनंतरही त्याने क्रिकेट
खेळायला आणि शूटिंग करायला देखील सुरुवात केली आहे. शाहिदने एक व्हिडिओ अपलोड करून त्याला झालेल्या जखमेबद्दल आणि घातलेल्या टाक्यांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
या व्हिडिओमध्ये त्याने ‘जर्सी’च्या शूटिंगसाठी घेतलेल्या कष्टप्रद ट्रेनिंग दिसते आहे. त्याने ग्राऊंडवर नेट समोर उभे राहून बॅटिंग करताना शाहिद दिसतो आहे. बॅटिंग करताना अनेकदा त्याला बॉल लागला आहे. अनेकदा तो विव्हळला आहे.
त्याने ट्रेनरकडून वेगवेगळे शॉट कसे मारायचे हे शिकून घेतले आहे. शेवटी तो जखमी झाल्याची दृश्ये दिसत आहेत. त्याच्या टीशर्टवर रक्ताचे डाग पडलेले दिसत आहेत. सर्वात शेवटी ‘हे रक्त माझे स्वतःचे आहे.’ असे शाहिदने म्हटले आहे.