कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन; 46व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बेंगळुरू – साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार (वय 46) यांचे निधन झाले आहे. पुनीत यांना आज सकाळी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
Actor Puneeth Rajkumar(in pic)was admitted after suffering chest pain at 11.30 am.Trying our best to treat him.His condition is serious.Can't say anything as of now.His condition was bad when brought to hospital, treatment on in ICU: Dr Ranganath Nayak, Vikram Hospital, Bengaluru pic.twitter.com/Gw4Xp5r5pV
— ANI (@ANI) October 29, 2021
एएनआयच्या वृत्तानुसार, सकाळी 11.30 वाजता छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरुन अभिनेता राजकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा जीव वाचावा म्हणून डॉक्टर प्रयत्नांची पराकष्ठा करत होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली. बंगळुरुच्या विक्रम रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पुतीन राजकुमार यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. टॉलिवूडपासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

