‘तुझ्या हे नेहमी लक्षात राहावं की…’, प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्ताने पत्नीने दिल्या हटके शुभेच्छा

Actor Prasad Oak | अभिनेता प्रसाद ओकचा आज (17 फेब्रुवारी) वाढदिवस आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शक म्हणूनही त्याने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, गायन अशा विविध क्षेत्रात त्याने स्वतःचा ठसा उमटवला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आता चाहते, मित्र-मैत्रिणी, कलाकार मंडळीकडून त्याला विशेष शुभेच्छा दिल्या जात आहेत.
प्रसादची पत्नी मंजिरी ओकनेही त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके शुभेच्छा दिल्या आहेत. मंजिरीने दोघांचे फोटो शेअर करत नवऱ्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसादला हटके पद्धतीने शुभेच्छा देत मंजिरीने लिहिले की, ‘का आहेत हे असे फोटोज? आणि मी आज का पोस्ट केलेत हे? प्रसाद त्याचं कारण, तुझ्या हे नेहमी लक्षात राहावं की जरी आपण एकमेकांकडे बघत नसलो तरी माझं लक्ष तुझ्यावरच आहे. बाकी ‘हॅप्पी बर्थडे’ वगैरे आहेच. ते होतंच राहील.’
View this post on Instagram
मंजिरीच्या या पोस्टवर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतर कलाकारांनीही कमेंट्स करत प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसादनेही या पोस्टवर कमेंट करत पत्नीचे शुभेच्छांसाठी आभार मानले. ‘लक्ष’, ‘लक्ष’ आभार हां मंजू.’,अशी कमेंट करत प्रसादने बायकोचे आभार मानले.
दरम्यान, प्रसादच्या कामाबद्दल सांगायचे तर लवकरच त्याचे ‘गुलकंद’, ‘सुशीला सुजीत’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘सुशीला सुजीत’चे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले असून, हा चित्रपट 18 एप्रिलला रिलीज होईल.





