Prakash Raj | Suvarnalatha – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांच्या आई स्वर्णलता यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्या वयोमानाशी संबंधित आजारांवर उपचार घेत होत्या. रविवारी, २९ मार्च रोजी त्यांनी राहत्या घरी प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार, स्वर्णलता या दीर्घकाळ आजारपणामुळे त्रस्त होत्या. त्यांच्या मेंदूत गाठी (ब्रेन ट्यूमर) झाल्याची माहिती स्वतः प्रकाश राज यांनी यापूर्वी दिली होती. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम झाला होता. Prakash Raj त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत प्रकाश राज आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. स्वर्णलता यांच्या पार्थिवावर सोमवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Prakash Raj Prakash Raj : ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांना मातृशोक; आई स्वर्णलता यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तसेच अभिनेते पवन कल्याण यांनीही स्वर्णलता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या मातोश्री श्रीमती स्वर्णलता यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.” Prakash Raj स्वर्णलता यांच्या पश्चात तीन मुले असून, त्यापैकी प्रकाश राज हे ज्येष्ठ आहेत. प्रकाश राज यांनी अनेक मुलाखतींमध्ये आईच्या संघर्षाचा आणि त्यांच्या आयुष्यातील योगदानाचा उल्लेख केला होता. आपल्या यशामागे आईचा मोठा वाटा असल्याचे ते नेहमीच सांगत असत. Prakash Raj