Karthi Injured : अभिनेता कार्तीच्या पायाला स्टंट करताना इजा; सरदार 2 चे शूटिंग थांबले, सेटवर नेमकं काय घडलं?

सरदार २ या चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगेणशा झाला असताना आता चित्रपटातील एका स्टंटवेळी अभिनेता सेटवर जखमी झाला असल्याची बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य अभिनेता कार्ती याच्या पायाला दुखापत झाली आहे. म्हैसूरमध्ये या चित्रपटातील काही अॅक्शन सीन्सची शूटिंग करताना त्याच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.
चित्रपटातील टीम मेबंर्सने कार्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असून त्याला डॅाक्टरांनी आठडाभर विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता बहुचर्चित सरदार २ चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे. या घटनेनंतर सरदार २ च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला असून चित्रपटाची टीम चैन्नईवरून परतली आहे. आता कार्ती दुखापतीमुळे बरा झाल्यानंतर शूटिंगला पुन्हा सुरूवात केली जाणार आहे, असे चित्रपटाच्या टीमने सांगितले आहे.
अशी घडली घटना
चित्रपटाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. कार्ती आणि निर्मात्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर टीम लवकरच शूटिंगला पुन्हा सुरूवात करणार आहे. सरदार 2 ची टीम चैन्नईतील एका फिल्म स्टुडिओमध्ये भव्य सेटवर चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट करत होती. कार्ती या सीनसाठी सहभागी झाला होता. स्टंट को-ऑर्डिनेटर चेतन रामशी डिसूझा याने एक हाय-ऑक्टेन स्टंट सीक्वेन्स कोरिओग्राफ केला. त्यावेळी ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे.
पीएस मिथरान दिग्दर्शित ‘सरदार 2’ मध्ये अभिनेता कार्ती दुहेरी भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या काळांवर आधारित असणार आहे. हा चित्रपट 2024 च्या मध्यात फ्लोरवर येणार आहे. काही आठवड्यांत त्याचे शूटिंग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. चित्रपटात कार्ती आणि राजिषा विजयन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सरदार २ मध्ये एसजे सूर्या, मालविका मोहनन आणि आशिका रंगनाथ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रिन्स पिक्चर्स निर्मित या चित्रपटाला संगीत युवन शंकर राजा यांनी दिले आहे.

