Actor Gulshal Devaiah : अभिनेता गुलशल देवैया बॅालिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. कांतारा चॅप्टर १ मध्ये गुलशन खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने या चित्रपटात कुलशेखर ही खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले. या चित्रपटाद्वारे गुलशने कन्नड चित्रपटसृष्टीत पदापर्ण केले. यानंतर आता तो टॅालिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची मुख्य भूमिका असलेल्या एका चित्रपटात गुलशन महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘माँ इंटी बंगाराम’ असून मूव्हिंग पिक्चर्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. अभिनेता आर. माधवन देखील चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त समारंभ पार पडला. या समारंभाला गुलशनने हजेरी लावली होती. कन्नडनंतर आता टॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पणाबद्दल गुलशन खूप आनंदी आणि उत्साही आहे. त्याने याविषयी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. या चित्रपटात तो कोणती भूमिका साकारणार याची माहिती मिळू शकलेली नाही. त्याला भूमिकेबद्दल विचारले असता याबद्दल जास्त काही बोलू इच्छित नाही, असे म्हणत त्याने त्याची भूमिका खूप आव्हानात्मक असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या भूमिकेसाठी त्याने तयारी सुरू केली आहे. गुलशनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘कांतारा: चॅप्टर १’ या चित्रपटात त्याने कुलशेखर नावाच्या राजाची भूमिका साकारली होती. हेही वाचा : देवोलीना भट्टाचार्जीने खरेदी केलं नवं घर; पतीच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मनं