आमदार बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Updated On:

अमरावती – अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. दर्यापूर तालुक्यातील प्रहारचे युवा तालुकाप्रमुख किरण होले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख खराटे यांच्या नेतृत्वात किरण होले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदचे माजी अपक्ष सदस्य सुनील डिके यांनीसुद्धा हाती शिवबंधन बांधले आहे. याव्यतिरिक्त दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथील सरपंच योगेश मापारी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. अचानक प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अपक्ष आमदार बच्चू कडू यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.





