भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यासमोरच भिडले कार्यकर्ते, आमदार ; हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : राजकीय क्षेत्रामध्ये मंत्र्यांच्या सामोरच अनेकदा कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडण्याच्या घटना समोर येतात. इतकेच काय हे प्रकरण अगदी हाणामारीपर्यंत गेल्याच्याही घटना आहेत. अशीच एक घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे कॅबिनेट मंत्र्यांसमोरच भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
मुरादाबाद में कैबिनेट मंत्री जितिन प्रसाद की मीटिंग में बीजेपी के दो गुटों के बीच जमकर मारपीट हुई. एक पदाधिकारी को कुछ लोगों ने जमीन पर गिराकर लात-घूसों से पीटा. एक विधायक को भी चोट लगी है. pic.twitter.com/hoyX4lVOuC
— Mangal Yadav (@MangalyYadav) June 10, 2022
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जितीन प्रसाद यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्किट हाऊस येथे ही बैठक सुरु होती. यादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री जितीन प्रसाद यांच्या समोरच स्थानिक आमदार रितेश गुप्ता आणि मनमोहन सैनी यांच्यामध्ये भांडण सुरु झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, अखेर आमदारांच्या समर्थकांनी भाजप मागासवर्गीय मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य मनमोहन सैनी याना बेदम मारहाण केली. शिवाय आमदारही किरकोळ जखमी झाल्याचे समजते आहे. हे सर्व होत असतांना मात्र मंत्री जितीन प्रसाद शांतपणे बसून असल्याचे सांगितले जात आहे.





