Cricket | बीसीसीआयवर कारवाई व्हावी – इंझमाम उल हक
Updated On:

लाहोर – भारत व इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवरून सुरू असलेले कवित्व अद्याप संपायचे नाव घेत नाही. त्यात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने उडी घेतली आहे.
आयसीसीने अशी सुमार खेळपट्टी तयार करणाऱ्या बीसीसीआयवर कारवाई करावी, अशी मागणी इंझमामने केली आहे. भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली की खेळपट्टीचाच परिणाम होता? अशा खेळपट्ट्या कसोटी सामन्यांसाठी बनवाव्यात का?, अशी विचारणाही त्याने केली आहे.





