After OLC : बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘आफ्टर ओ.एल.सी’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी चित्रपटातील कलाकार आणि इतर टीमही उपस्थित होती. रहस्यमय थरार, एक्शन पॅक्ड सीन्सने भरलेला या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा प्रचंड वाढवलेली आहे. हा चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीला जोडणारा धागा आहे. कारण यांत निर्माते ते अगदी कलाकार हे कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीतील दिग्गज आहेत. त्यामुळे एक अनोखा प्रयोग या चित्रपटाच्या निमित्ताने सर्वांसमोर येणार आहे. दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी आफ्टर ओ एल सी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा ही नक्षलवादी पार्श्वभीवर आधारित आहे. येत्या २८ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटागृहात हिंदी, मराठी आणि कन्नड या तिन्ही भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेता कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके यांच्यासह प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार, रुक्मिणी सुतार हे कलाकार पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमधील सीन पाहता चित्रपटातील लोकेशन्स नक्षलवादी भागांत शूट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून साऊथ चित्रपटातील टच या चित्रपटाला असल्याचे जाणवते. या चित्रपटात अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हेही वाचा : “पराभवाची जबाबदारी पूर्णपणे…” ; पक्षाच्या फ्लॉप शोवर प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया