पिंपरी | अॅसिड फेकण्याची, जिवे मारण्याची धमकी
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – एका व्यक्तीच्या भाच्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अश्लील मेसेज पाठवत पत्नी आणि मुलीवर अॅसिड फेकण्याची धमकी दिली. हा प्रकार जानेवारी ते 18 जून २०२४ या कालावधीत चिखली परिसरात ऑनलाईन माध्यमातून घडला.
अहमदनगर येथे राहणार्या ३९ वर्षीय नागरिकाने सोमवारी (दि. २४) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नरेंद्र सोनवणे (वय 39, रा. अहमदनगर), दिग्विजय आबू सोनवणे (वय 19, रा. अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या भाच्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फिर्यादी यांची पत्नी आणि मुलीबाबत अश्लील व शिवीगाळ केल्याचे मेसेज पाठवले. त्यानंतर जिवे मारण्याची तसेच अॅसिड फेकण्याचे धमकीचे मेसेज पाठवून अश्लील फोटो पाठवले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.





