“संपूर्ण देश ख्रिश्चनमय करण्याचा डाव; त्यामुळेच केलं जातंय रामदेव बाबांना टार्गेट”

नवी दिल्ली – करोना रुग्णांवरील एलोपॅथी उपचारांबाबत योगगुरू रामदेव बाबा यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर IMA ने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र त्यांच्यावर केलेली टीका ही केवळ देशाला ख्रिश्चनमय करण्यासाठी असल्याचा अजब दावा करण्यात आला आहे.
रामदेव यांचे निकटवर्तीय आचार्य बालकृष्ण यांनी आयएमएचे अध्यक्ष डॉ. जयालाल यांचे एक कथित वक्तव्य सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यात म्हणण्यात आले आहे, की जयालाल हे रुग्णालयांत आणि शाळांमध्ये ख्रिश्चनिटीचा प्रचार करतात. व्हिडीओ शेअर करत बालकृष्ण म्हणाले की, संपूर्ण देश क्रिश्चयानिटीत कन्व्हर्ट करण्याच्या षड्यंत्रांर्गत, रामदेव यांना टार्गेट करून योग आणि आयुर्वेदाला बदनाम केले जात आहे. देशवासियांनो, आता तरी गाढ झोपेतून जागे व्हा, अन्यथा येणाऱ्या पिढ्या तुम्हाला क्षमा करणार नाही.
पूरे देश को #Christianity में convert करने के षड्यंत्र के तहत, @yogrishiramdev जी को target करके #योग एवं #आयुर्वेद को बदनाम किया जा रहा है। देशवासियों, अब तो गहरी नींद से जागो🙏 नहीं तो आने वाली पीढ़ियां तुम्हें माफ नहीं करेंगी। pic.twitter.com/XADqXiGJIT
— Acharya Balkrishna (@Ach_Balkrishna) May 24, 2021
तत्पूर्वी आयएमएने बाबा रामदेव यांच्यावर महामारी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा. त्याचवेळी आपले गुरू रामदेव आणि पतंजली उद्योगावरील होत असलेला लोकांचा हल्ला पाहून आचार्य बालकृष्णदेखील मैदानात उतरले आहेत. बालकृष्ण यांनी योग आणि आयुर्वेद नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा अजब दावा केला आहे.



