पुणे (प्रतिनिधी) – खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस समर्थ पोलिसांच्या गस्ती पथकाने जेरबंद केले आहे. संबंधीत आरोपीवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तसेच तो समर्थ पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सुरज अशोक ठोंबरे असे आरोपीचे नाव आहे. त्याला ताब्यात घेतऊन फरासखाना पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
यासंदर्भात सविस्तर असे की, समर्थ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, हवालदार संतोष काळे, सुशिल लोणकर, पोलिस नाईक प्रमोद टिळेकर, पोलिस शिपाई निलेश साबळे, अनिल शिंदे, गणेश कोळी, सुमित खुट्टे, स्वप्निल वाघोले हे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हद्दीत गस्त घालत होते.
धनगरवाडा नाना पेठ परिसरात ते आले असता, त्यांना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सुरज ठोंबरे हा संषयास्पदरित्या फिरताना दिसला. त्याची चौकशी करता, तो फरासखाना पोलिस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात मागील वर्षभरापासून फरार असलेला आढळला. त्याची ताबडतोब वैद्यकीय तपासणी करुन त्याला फरासखाना पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आले.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त मिलींद पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, हवालदार संतोष काळे, सुशिल लोणकर,राजस शेख, पोलिस नाईक प्रमोद टिळेकर, पोलिस शिपाई निलेश साबळे, अनिल शिंदे, गणेश कोळी, सुमित खुट्टे, स्वप्निल वाघोले, सचिन पवार, साहिल शेख, निलेश साबळे, गणेश कोळी, सुमित खुट्टे यांच्या पथकाने केली.