गोंदिया हादरले ! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करत आरोपीने स्वत:लाही संपवलं

गोंदिया – एकाच कुटुंबातील तिन जणांची हत्या करून नंतर आरोपीने स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चुरडी गावात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रेवचंद डोंगरु बिसेन (वय 51), मालता रेवचंद बिसेन (वय 45), पौर्णिमा रेवचंद बिसेन (वय 20), तेजस रेवचंद बिसेन (वय 17) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

सकाळपासून बिसेन यांच्या घरात कोणतीच हालचाल दिसत नव्हती त्यामुळे शेजारच्यांनी चौकशी केली असता त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मात्र हे खून नेमके कोणत्या कारणाने केले गेले याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास पोलिस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.