Nagar | कर्मचाऱ्यांना शिर्डी संस्थानमध्ये सामावून घ्या

नगर, (प्रतिनिधी) – साईबाबा देवस्थान संस्थानमध्ये सलग दहा वर्षे सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थानच्या सेवेत सामावून घेवून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी, खासदार नीलेश लंके यांनी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
खा. लंके यांनी म्हटले आहे की, संस्थानमध्ये दहा वर्षे सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम करण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिलेला आहे. तसेच समितीने (दि.२) ऑगस्ट २०१४ च्या मान्यतेनुसार सादर करण्यात आलेल्या शिर्डी संस्थानच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे.
तसे पत्रही विधी व न्याय विभागाने संस्थानकडे पाठविलेले आहे. परंतू दहा वर्षे सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत अद्यात कायम करण्यात आलेले नाही.
संस्थानने न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच विधी व न्याय विभागाच्या पत्रानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी खा. लंके यांनी केली.



