सांगलीत संभाजी भिडे गुरुजींचा अपघात; सायकलवरून पडल्याने जखमी
Updated On:

सांगली – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सांगलीत अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजी भिडे गुरुजी सायकलवरून पडले आहेत.
सायकल चालवत असताना त्यांना अचानक चक्कर आला आणि त्यातून ते जमिनीवर पडले. या अपघआतात ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भिडे गुरुजी सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी सायकलवरून जात होते. पण या दरम्यान त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे ते सायकलवरुन खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.





