Accident News : धक्कादायक ! जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू
हिंगोली-रिसोड राज्यमार्गावर एक अत्यंत भीषण आणि मनाला चटका लावणारी अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे.

Accident News : हिंगोली-रिसोड राज्यमार्गावर एक अत्यंत भीषण आणि मनाला चटका लावणारी अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. एका भरधाव पिकअप आणि बुलेटमध्ये झालेल्या जोरदार धडकेत जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
सेनगाव शहराजवळ हा थरकाप उडवणारा अपघात (Accident News) घडला असून, गजानन पत्की आणि संतोष देसाई अशी मृत्यू झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे दोन्ही शिक्षक दारूच्या नशेत असल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
जनगणनेचे काम करून पाहुण्यांकडे गेले अन्…
मृत्यू झालेले गजानन पत्की आणि संतोष देसाई हे दोघेही हिंगोली जिल्ह्यातील वरुड चक्रपान या गावातील रहिवासी होते. शासकीय कर्तव्यावर असताना, जनगणनेचे काम आटोपून ते दोघे बुलेटने रिसोड येथे आपल्या पाहुण्यांकडे (Accident News) गेले होते. पाहुण्यांकडील पाहुणचार घेतल्यानंतर रात्रीच्या सुमारास ते बुलेटवरून आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, हा प्रवास त्यांचा अंतिम प्रवास ठरेल अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.
शरीराचा चक्काचूर; चालक वाहन घेऊन फरार!
दोन्ही शिक्षक सेनगाव शहराच्या जवळ आले असताना, समोरून येणाऱ्या एका भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली.हा अपघात इतका भयंकर होता की, पिकअपच्या धडकेमुळे बुलेटचा चक्काचूर झालाच, सोबतीने दोन्ही शिक्षकांच्या शरीराला गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पिकअप चालकाने मानवतेला काळिमा फासत, जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून वाहन घेऊन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. सध्या पोलीस फरार पिकअप चालकाचा शोध घेत आहेत.
वरुड चक्रपान गावावर दुःखाचा डोंगर
गजानन पत्की आणि संतोष देसाई हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने त्यांचा परिसरात मोठा जनसंपर्क आणि आदर होता. जनगणनेचे शासकीय काम सुखरूप आटोपून ते घरी परततील अशी आशा त्यांच्या कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना होती.
मात्र, अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी धडकल्याने वरुड चक्रपान गावावर शोककळा पसरली आहे. दोन हसत्या-खेळत्या शिक्षकांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने स्थानिक नागरिक आणि शिक्षण वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.






