Tejashwi Yadav : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात झाला आहे. सोमवारी 26 फेब्रुवारी रोजी पूर्णियातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या बेलौरीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कार अनियंत्रित होऊन ताफ्यातील कारला धडकली. यात वाहन चालकाचा मृत्यू झाला तर 6 पोलीस जखमी झाले आहेत. याशिवाय दुसऱ्या कारमध्ये प्रवास करणारे चार नागरिकही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव पूर्णिया, अररिया, किशनगंजच्या जनविश्वास यात्रेवर आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास ते पूर्णियाहून कटिहारकडे जात होते. तेव्हा हा अपघात झाला. अपघातानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तेजस्वी यात्रा बिहारमध्ये जनविश्वास यात्रा काढत आहे. 20 फेब्रुवारीपासून त्यांचा प्रवास मुझफ्फरपूरपासून सुरू झाला. कसा घडला अपघात? जनविश्वास यात्रेदरम्यान तेजस्वी यादव यांचा सोमवारी ताफा पूर्णियातील बेलौरी येथून जात होता. या स्काऊट वाहनाचाही या ताफ्यात समावेश होता. या स्काऊट वाहनाचाही या ताफ्यात समावेश होता. पूर्णिया कटिहार चार लेन रोडवर गाडी चुकीच्या बाजूला गेली. त्यामुळे कटिहारकडून येणाऱ्या लाल रंगाच्या कारची जोरदार धडक झाली. ज्यामध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे. यात दोन्ही गाडीचा चक्काचूर झाला असून यात मोहम्मद हलीमचा मृत्यू झाला आहे. ते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील एका कारचे चालक होते.