भरधाव बीएमडब्ल्यू चालविणाऱ्या तरुणीने दिली धडक, एकाचा मृत्यू
Updated On:

दिल्ली – उत्तर दिल्लीतील कल्याणपुरी भागात बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात काल रात्री 2.45 च्या सुमारास कल्याणपुरी भागातील लाल बहादूर शास्त्री हॉस्पिटलजवळ झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्ठळी धाव घेतली आहे.
राहुल असे अपघातात मृत झालेल्या वक्तीचे नाव असून त्याचे वय अंदाजे 36 वर्षे होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ड्रायव्हर अश्विनीला ताब्यात घेतले आहे. 21 वर्षीय अश्विनी गाझियाबाद येथील इंदिरापुरम येथे राहते. पोलिसांनी कलम 304अ/279/337 अन्वये गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपासास सुरूवात केली आहे.





