पुणे -ग्रामीण भागात करोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा सुरळीत होत असल्याने लसीकरणाचा गती मिळाली आहे. शुक्रवारी (दि. 9) रात्री ग्रामीणसाठी 41 हजार 300 लसीचे डोस आले आहेत. त्यानुसार केंद्रनिहाय त्याचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये कोविशिल्ड लसीचे 36 हजार 400 तर, कोवॅक्सिनच्या 4 हजार 900 डोसचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात जवळपास 772 लसीकरण केंद्र कार्यन्वित असून, त्यात 557 शासकीय तर 215 केंद्र हे खासगी आहेत. मिळणाऱ्या लसीच्या प्रमाणानुसार केंद्रांना त्याचे वितरण केले जाते. शनिवारी (दि.10) कोविशिल्डचे 36 हजार 400 डोस वितरित करण्यात आले. त्यात सर्वाधिक हवेली तालुक्याला 3 हजार 300 डोस, इंदापूर, जुन्नर, मावळ व खेड तालुक्याला प्रत्येकी 2,900, दौंड आणि शिरूर तालुक्यात प्रत्येकी 2 हजार 700, बारामती व मुळशी तालुक्याला प्रत्येकी 2,500 डोस वितरीत करण्यात आले. कोविशिल्ड आणि (कोवॅक्सिन) आकडेवारी आंबेगाव – 2300 (200), बारामती – 2500 (200), भोर – 2100 (200), दौंड – 2700 (200), हवेली – 3300 (300), इंदापूर – 2900 (300), जुन्नर – 2900 (300), खेड – 2900 (300), मावळ – 2900 (300), मुळशी – 2500 (200), पुरंदर – 2300 (200), शिरूर – 2700 (200), वेल्हा – 1700 (200), औंध जिल्हा रुग्णालय – 1200 कोवॅक्सिन, पुणे कॅन्टोन्मेंट – 600 (200), खडकी कॅन्टोन्मेंट – 600 (200), देहू कॅन्टोन्मेंट – 500 (200), एएफएमसी – 1000 कोविशिल्ड.