Koynanagar: पाटण मतदारसंघातील विकासकामांना गती द्या; पालकमंत्री शंभूराज देसाई
Koynanagar दौलतनगर येथील विश्रामगृहात शुक्रवारी त्यांनी पाटण मतदारसंघातील विविध विभागांच्या विकासकामांचा आढावा घेताना ते बोलत होते. मतदारसंघातील मंजूर विकासकामे प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडू नयेत, उपलब्ध निधीचा योग्य विनियोग करुन सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करावीत, कामांची गुणवत्ता राखण्याबरोबरच त्यांच्या प्रगतीवर संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित लक्ष ठेवावे, असे देसाई यांनी स्पष्ट केले. पाटण तालुक्यातील पर्यटनविषयक प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

Koynanagar: पाटण विधानसभा मतदारसंघातील विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करून त्यांचा दर्जा राखावा. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करावे. दुष्काळ निवारणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
दौलतनगर येथील विश्रामगृहात शुक्रवारी त्यांनी पाटण मतदारसंघातील विविध विभागांच्या विकासकामांचा आढावा घेताना ते बोलत होते. मतदारसंघातील मंजूर विकासकामे प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडू नयेत, उपलब्ध निधीचा योग्य विनियोग करुन सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करावीत, कामांची गुणवत्ता राखण्याबरोबरच त्यांच्या प्रगतीवर संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित लक्ष ठेवावे, असे देसाई यांनी स्पष्ट केले. पाटण तालुक्यातील पर्यटनविषयक प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
पर्यटनातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी, यासाठी नियोजन करण्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश झाल्याने प्रशासनाने अधिक सतर्क राहवे, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन आवश्यक ती मदत आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करून संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.





