Abhishek Banerjee Attack: बंगाल पोलिस ऍक्शन मोडमध्ये ; अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणात ५ आरोपींना अटक
Abhishek Banerjee Attack:

Abhishek Banerjee Attack: तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी आता बंगालचे पोलीस ऍक्शनमोडमध्ये आल्याचे दिसून येत आहेत. कारण आता या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये तपन मैती आणि आकाश यांचा समावेश आहे, जे या घटनेशी संबंधित एका व्हिडिओमध्ये दिसले होते. पोलिसांनी तपास तीव्र केला असून पाचही आरोपींची चौकशी करत आहेत.
अभिषेक बॅनर्जी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सोनारपूर येथे निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेट देत असताना त्यांच्यावर जमावाने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि राज्यातील राजकारण तापले.
ममता बॅनर्जी यांचा भाजपवर आरोप Abhishek Banerjee Attack:
टीएमसी प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हल्ल्यासाठी भारतीय जनता पक्षाला (भाजप) जबाबदार धरले आहे. मात्र, भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, अभिषेक बॅनर्जी यांना वैद्यकीय उपचार मिळण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
ते म्हणाले, “सत्तेतील लोक अभिषेक बॅनर्जी यांना रुग्णालयात दाखल होऊ न देण्यासाठी रुग्णालये आणि संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत, कारण त्यांना त्यांच्यावर उपचार होऊ द्यायचे नाहीत.” ही एक अत्यंत चिंताजनक परिस्थिती असल्याचे सांगत त्यांनी पश्चिम बंगालमधील नवीन भाजप सरकारवर निशाणा साधला.
वैद्यकीय तपासणीत कोणतीही गंभीर दुखापत आढळली नाही
बेल व्ह्यू क्लिनिकने जारी केलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, ३८ वर्षीय अभिषेक बॅनर्जी यांची ३० मे २०२६ रोजी सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांना त्यांच्या शरीरात कोणतीही गंभीर दुखापत आढळली नाही. वैद्यकीय अहवालात केवळ त्यांच्या छातीवर एक किरकोळ जखम (मार लागल्याची खूण) नमूद करण्यात आली होती. अहवालानुसार, तपासणीदरम्यान अभिषेक बॅनर्जी पूर्णपणे शुद्धीवर, सावध होते आणि सामान्यपणे बोलत होते.
रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही Abhishek Banerjee Attack:
त्यांच्या प्रकृतीचे मूल्यांकन केल्यानंतर, डॉक्टरांनी ठरवले की त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. खबरदारी म्हणून, त्यांना नॉर्मल सलाईन, रिंगर्स लॅक्टेट आणि वेदनाशामक औषधे देण्यात आली.





