Abelardo de la Espriella : कोलंबियाच्या अध्यक्षपदी अबेलार्दो दे ला एस्प्रिएला यांची निवड
कोलंबियाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अबेलार्दो दे ला एस्प्रिएला (Abelardo de la Espriella) यांची निवड झाली आहे.

Abelardo de la Espriella : कोलंबियाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अबेलार्दो दे ला एस्प्रिएला (Abelardo de la Espriella) यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान रविवारी झाले होते. देशात पुन्हा अराजकता निर्माण होण्याची भीती असतानाच ही अध्यक्षीय निवडणूक झाली आहे.
मावळते अध्यक्ष गस्ताव पट्रो यांच्या धोरणांना एस्प्रिएला (Abelardo de la Espriella) यांच्याकडून विरोध केला जाण्याची अपेक्षा आहे. त्यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा असल्यामुळे ही निवड लक्षवेधी ठरली आहे. डे ला एस्प्रिएला हे एक व्यापारी आणि वकील आहेत. त्यांचा प्रत्यक्ष राजकारणाशी आतापर्यंत संबंध आलेला नव्हता. तरी ट्रम्प यांनी त्यांना पाठिंबा दिला होता.
दे ला एस्प्रिएला यांनी अमली पदार्थांच्या तस्करीसह गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी कठोर भूमिका घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पेट्रो यांनी सुरू केलेली समांतर सशस्त्रगटांबरोबरची चर्चा ते थांबवण्याचीही शक्यता आहे. निवडणुकीत संसद सदस्य इव्हान सेपेडा यांच्याविरोधात ४९.७ टक्के मते मिळाली. तर सेपेडा ४८.७ मते मिळाली.
अद्याप निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झालेला नसला, तरी एस्प्रिएला (Abelardo de la Espriella) यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. सुमारे ३० हजाराहून अधिक मतदान केंद्रांच्या निकालांना आव्हान दिले जाईल, असे सेपेडा यांनी म्हटले आहे. कोलंबियाच्या अध्यक्षीय निवडणुकांच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधीही फेरमोजणी करण्यात आलेली नाही.






